Home गुन्हा गुटका गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा

गुटका गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा

ता. भिवंडी जिल्हा. ठाणे -प्रतिनिधी :शफिक शेख

दिनांक:- 28/5/2020 रोजी सकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने गाळा क्रमांक ए/११/२ ए १, प्रेरणा कॉम्प्लेक्स,वळगाव ता. भिवंडी जिल्हा. ठाणे या गोदामावर गोपनीय माहितीच्या आधारे अचानक छापा टाकून तेथे हजर असलेल्या सुरज हरीश ठक्कर यांच्या ताब्यातून विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू या महाराष्ट्र राज्यत बंदी असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थाचा रक्कम रुपये ८७,९९,८२२/- किमतीचा साठा जप्त केला. सदर साठ्याचा मालक इसरार नामक व्यक्ती असल्याचे तसेच त्यास या कामात अब्बास व अर्जुन सेठ हे मदत करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम व भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्ह्यासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई अन्न व प्रशासन मंत्री नामदार राजेंद्र शिंगणे, राज्य मंत्री ना. राजेंद्र यड्रावकर व मा. आयुक्त श्री. अरुण उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त (दक्षता) श्री. सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली गुप्तवार्ता विभागातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडली अशा प्रकरणांच्या प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या गोदाम बाबत माहिती अथवा तक्रार असल्यास त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आव्हान सहआयुक्त दक्षता श्री सुनील भारद्वाज यांनी जनतेला केले आहे.