परवेज शेख दि:5 गुटख्याच्या अवैध वाहतुकीला चाप बसवण्यासंदर्भात मंत्रालयात विशेष बैठक घेतली. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा, मावासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादक, विक्रेते आणि गुटखा कंपन्यांच्या मालकांवर तसेच सूत्रधारांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. गुटखा प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक आढळून आल्यास तिथले अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.यावेळी गृहमंत्री Anil Deshmukh, अन्न व औषध प्रशासन मंत्री Dr.Rajendra B. Shingne उपस्थित होते.

राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. गुटखा विक्रीसंदर्भातली माहिती मिळवण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यात यावे.

तसेच गुटखाबंदी विरोधात जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना केल्या. राज्यभरात परराज्यांच्या सीमेवरुन सर्रास गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची आयात केली जाते. यामुळे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होत असून त्याचे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलीस तसेच परिवहन विभागाचे अधिकारी समन्वयाने कारवाई करतील.























WhatsApp