शहरात अनेक ज्येष्ठ नागकरिकांची मुले परदेशी, बाहेरगावी नोकरीला आहेत. त्यामुळे अनेक जण एकटे राहतात. त्यांना केअर टेकरची गरज असते. त्याचा फायदा या टोळ्या घेतात. नर्सिंग ब्युरोमार्फत ज्येष्ठांकडे काम करून नंतर त्यांना लुटतात. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी; तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
नर्सिंग ब्युरोवर कारवाईच नाही
शहरात नर्सिंग ब्युरोमार्फत काम मिळवून लुटमार केल्याचे पाच ते सहा गुन्हे घडले आहेत. गुन्हा घडल्यानंतर नर्सिंग ब्युरोची नाममात्र चौकशी केली जाते. त्याचे पुढे काहीच होत नाही. त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेल्या कामगारांचे ‘पोलिस व्हेरिफिकेशन’ का केले नाही; म्हणून गुन्हासुद्धा दाखल करत नाहीत. असे गुन्हे वाढत असताना शहर पोलिसांच्या हद्दीत केअरटेकर पुरवणारे किती नर्सिंग ब्युरो आहेत, याचीही माहिती पोलिसांकडे नसल्याचे समोर आले आहे.