Home गुन्हा गुन्हे शाखेच्या युनिट ४ कडील पोलिसांनी शिताफीने पकडून अटक

गुन्हे शाखेच्या युनिट ४ कडील पोलिसांनी शिताफीने पकडून अटक

0

पुणे, दि. ६ जून (परवेज शेख ) : उस्मानाबाद जिल्यातील उमरगा येथील एका इसमाचा खून करून पुण्यात पळून आलेल्या दोन गुन्हेगारांना पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या युनिट ४ कडील पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर दुधभाते (वय ४०, रा. औराद, ता.
उमरगा, जि. उस्मानाबाद) याचा शेतीच्या वाटणीच्या कारणावरून व
वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांचा पुतण्या अक्षय दुधभाते
(रा. पुणे) याने त्याच्या गावातील दोन इसम व पुणे येथील साथीदार मंगेश
चौधरी (वय २०, रा. कर्वेनगर), सागर ढोकणे (वय १९, रा. कर्वेनगर)
यांच्यासह वेळूच्या काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून करून
पुण्यास पळून आले होते. त्यानंतर मंगेश चौधरी व सागर ढोकणे
उमरग्याहून फरार झाले होते. दोघेही पुण्यातील पाषाण-सूस रोडवर साई
चौक येथे येणार असल्याची बातमी युनिट-४ चे पोलीस हवालदार सुनील
पवार यांना मिळाल्यावर त्यांनी ती युनिट-४ चे पोलीस निरीक्षक अंजुम
बागवान यांना सांगितली. त्याप्रमाणे ५ जून रोजी सापळा रचून पहाटे ५
वाजता त्यांना पकडून उमरगा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई गुन्हेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त
बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस
निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी सुनील पवार, भालचंद्र बोरकर, राजू मचे,
विशाल शिर्के, दत्तात्रय फुलसुंदर, सुहास कदम गणेश काळे सर्व नेमणूक
युनिट ४ यांनी केली आहे.