
पुणे : परवेज शेख
पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत मा. पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेमधून व माननीय पोलीस सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कॉप्स एक्सलन्स हॉल येथे गुन्ह्यातील किमती व मौल्यवान माल पुनःप्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास श्री. अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) पुणे शहर, श्री. बच्चन सिंह, पोलीस उप आयुक्त [गुन्हे] व इतर परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस निरीक्षक व संबंधित पोलीस स्टेशनचे मुद्देमाल कारकून व फिर्यादी/मालक असे एकूण ३०० लोक उपस्थित होते.



सदर कार्यक्रमामध्ये विविध पोलीस स्टेशनकडील एकूण ७३ गुन्ह्यांतील रुपये १,१८,७०,९००/- किमतीचे सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, वाहने असा मुद्देमाल श्री. अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते संबंधित फिर्यादी व मालकास पुनः प्रदान करण्यात आला. श्री. अशोक मोराळे यांनी उपस्थितांना सीसीटीव्ही लावण्याबाबत तसेच आवश्यक तेथे वॉचमन नेमण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर उपस्थितांपैकी काहींनी मुद्देमाल परत मिळवून देणेकामी पोलिसांच्या कामगिरीबाबत त्यांचे अभिनंदन केले व पोलिसांच्या तातडीने मिळालेल्या सहकार्याबाबत विशेष आभार व्यक्त केले.सदर कामाचे सूत्रसंचालन डॉ. श्री. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त अभियोग, [गुन्हे] पुणे शहर व प्रस्तावना श्री. बच्चन सिंह, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), पुणे शहर यांनी केले असून आभार प्रदर्शन श्री. अजीत लाकडे, पोलीस निरीक्षक पीसीबी (गुन्हे), पुणे शहर यांनी केले.
