Home बातम्या ऐतिहासिक गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील विविध कामांचा आढावा – महासंवाद

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील विविध कामांचा आढावा – महासंवाद

0
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील विविध कामांचा आढावा – महासंवाद

सातारा दि. 28: गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी  दरडप्रवण गावांचे पुनर्वसन, कोयना जलाशयातील नौकाविहार जागा निश्चितीबाबतचा आणि जिंती ता. पाटण येथील अंशत: बाधित झालेल्या गावाचा पुनर्वसनाच्या  प्रस्तावबाबत यासह  विविध कामांचा आढावा  जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांतधिकारी सुनिल गाडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ति  नलावडे, तहसिलदार रमेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पाटण तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत पाठपुरावा करण्यात यावा.  कोयना जलाशयात नौकाविहाराची जागा निश्चित करण्याबाबत पाहणी करण्यात आली आहे. त्याचा योग्य तो सुधारित प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा. तसेच जिंती ता. पाटण येथील अशंत: बाधित झालेल्या गावाच्या पुनर्वसन प्रस्तावाबाबतही  गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला.

0000