मुंबई:-
गॅस कटरचा वापर करून सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून मालमत्ता जप्त केल्याबाबत 15/07/2020 रोजी फिर्यादी नामे श्री महेंद्र मांगीलाल जैन वय 45 वर्षे यांच्या तक्रारी वरून चेंबूर पोलीस ठाणे गुरक्र 272/2020 कलम 454,457,380,34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि ओलेकर,पो उप नि प्रदीप पाटील व पो ह जाधव, साळुंखे, पो शी पवार,पाटील, सुधीर माने ,प्रदीप माने यांनी सी सी टी व्ही फूटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने नमूद आरोपी यांना फारस रोड,नागपडा मुबंई येथून ताब्यात घेऊन पोलीस ठानेस आणून त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
आरोपीचे नाव:-
1)जाहिद याकूब मुनेजात वय 24 वर्षे राठी रु न 69,नागु सयाजी चाळ, फारस रोड,नागपाडा,मुंबई
2)तालिब गुल्फाम राजपूत वय 16 वर्षे (विधिसंघर्षग्रस्त बालक)
नमूद आरोपींकडून खालील प्रमाणे मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे-
अ.की. रु 1,79,500/- चे सोन्या चांदीचे दागिने
नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत आहोत.