Home ताज्या बातम्या गेल्या 24 तासात देशात 357 कोरोना रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 357 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली :- कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासात 357 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 996 नवीन प्रकरणं समोर आले आहेत. देशातील एकूण रुग्णांचा आकडा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 8 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत 1 लाख 41 हजारांपेक्षा जास्त लोक हे बरे झाले आहेत. तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 1 लाख 37 हजार 448 एवढी आहे.

कोरोनाचे सर्वात जास्त केस या महाराष्ट्रात आहेत. येथे एकूण रुग्णांचा आकडा 94 हजारा पार झाला आहे. यामधून 3438 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 46 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस आहेत. दूसऱ्या नंबरवर तामिळनाडू आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या जवळपास 37 हजार आहे. तर 326 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे 17 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस आहेत.

तर दिल्लीमध्ये रुग्णांचा आखडा हा 33 हजारांच्या जवळपास पोहोचा आहे. सध्या एकूण रुग्णांची संख्या 32 हजार 810 झाली आहे. यामधील 984 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हजारांपेक्षा जास्त लोक हे बरे झाले आहेत. दिल्लीमध्ये संख्या 19 हजार 581 अॅक्टिव्ह केस आहेत. गुजरातमध्ये एकूण रुग्णांचा आकडा 21 हजारांपेक्षा जास्त आहे. यामधील 1347 लोकांचा मृत्यू झाला आहे.