Home बातम्या गोडाऊनमध्ये बलात्कार

गोडाऊनमध्ये बलात्कार

0

पुणे : परवेज शेख , दि. १३ मे (प्रतिनिधी) : पुरंदर तालुक्यातील वीर या गावात एका छत्तीस वर्षीय महिलेवर तिच्याच गोडाऊनमध्ये एका आरोपीने बलात्कार केला आहे.

मिळालेल्या माहितीवरून, दि. २९ एप्रिल रोजी दुपारी २ वा.चे सुमारास
फिर्यादी महिलेला आरोपीने तरकारी पिशवी विकत घ्यायची असल्याचे
सांगून तिचे गोडाऊन उघडण्यास लावले. नंतर आरोपीने आतून कडी लावून महिलेच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढून तिच्यावर बलात्कार केला. तसेच महिला व तिच्या मुलाला कोणाला सांगितले तर जीव घेण्याची धमकी दिली. याबाबत सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके करीत
आहेत.