Home अश्रेणीबद्ध गोवंश हत्या करणारा अटकेत

गोवंश हत्या करणारा अटकेत

0

गोवंश हत्या करणारा अटकेत
पुणे : परवेज शेख देहूरोड स्टेशनच्या हद्दीत गोवंश हत्या म्हणून प्राणी संरक्षण अधिनियमानुसार नईम सिलार कुरेशी (वय ४०, रा. पिंपरी) याला २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पोलिसांनी अटक केली असून दुसरा महेबूब नावाचा आरोपी फरार आहे. सदर बाब२७ ऑक्टोबर रोजी ३ वाजता घडल्याचे नजरेस आले.
मिळालेल्या माहितीनुसार, समाजसेवक शिवशंकर स्वामी (वय २६, रा. रेव्हेन्यु कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे सदर ठिकाणी गोवंश जनावरे कापीत असताना, तसेच जिवंत गावरान बैल असे मिळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे. यात १,२०,०००/-जिवंत गाय कापलेल्या अवस्थेत तुकडे केलेले ६०० ग्रॅम मांस व १० हजार रूपयाचा जिवंत गावरान जातीचा असा एकूण १,३०,०००/- रूपयाचा माल मिळून आला.
देहुरोड पोलिस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.