Home शहरे जळगाव गोविंद शिरोळे यांची उमेदवारी अटळ पारोळा मतदान संघ

गोविंद शिरोळे यांची उमेदवारी अटळ पारोळा मतदान संघ

0

पारोळा : प्रतिनिधी

एरंडोल मतदारसंघ हा एरंडोल पारोळा तालुक्याचा मिळून संयुक्त मतदारसंघ आहे या मतदारसंघावर पारोळ्याचे वर्चस्व आहे सेनेचे चिमणराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सतीश अण्णा पाटील अल्टुं पालटून आमदारकी मिळवत आले आहेत. पक्षाचे संघटन आणि समाजाचं पाठबळ यामुळे हेच विजयाचे स्वप्न पाहतात मात्र या निवडणुकीत नवा इतिहास घडविण्याची शक्यता निर्माण झाली आहे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंदराव शिरोळे यांनी निवडणुकीत शड्डू ठोकल्याने प्रस्थापितांनी मध्ये दाणादाण उडाली असून त्यांच्या विजयाची समीकरणे बांधीत होणार आहेत.
होऊ घातलेल्या निवडणुकीत सेनेतर्फे माजी आमदार चिमणराव पाटील तर राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे डॉक्टर आमदार सतीश अण्णा पाटील यांची उमेदवारी फक्त घोषित व्हायची बाकी आहे युती झाली तर ही प्रमुख लढत होईल असं मानलं जात असताना एका नवीन धमाल उडवून दिली आहे गोविंदराव शिरोळे हे निवडणुकीत उतरण्याचे निश्चित झाले आहे युती झाली नाही तर ते भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. युती झाली तरी ते अपक्ष उभे राहण्याची तयारी करून आहेत गेल्या वेळी युती नसताना भाजपतर्फे मच्छिंद्र पाटील यांनी निवडणूक लढवली होती तरी सतीश अण्णा पाटील सेनेच्या चिमणराव पाटील यांचा पराभव करत विजय खेचून आणला होता एरंडोल मतदारसंघात नेहमी दुरंगी होणारी लढत गोविंदराव शिरोळे यांच्या आगमनाने तिरंगी होणार ही  काळा दगडावरची रेघ आहे यामुळे संभाव्य उमेदवारांची समिकरण बदलतील आणि मतदान संघात मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे चिमणराव पाटील व सतीश अण्णा पाटील मध्ये मतदारांनी अनेकदा संधी देऊन अजमावून पाहिले आहेत. आता त्यांच्यापुढे माजी नगराध्यक्ष गोविंदराव शिरोळे यांच्या रूपाने नवा सक्षम पर्याय समोर आला आहे त्यांनी नगराध्यक्ष असताना आपली स्वतःची वेगळी छाप निर्माण केले आहे शिवाय त्यांच्या स्वतःच्या उद्योग व्यवसाय आहे त्यामुळे परिसरातील ७०० लोकांना रोजगार मिळत आहे. व गोविंद शिरोळे स्वतः एक उच्च उद्योगपती आहेत.