हायलाइट्स:
- आर्थिक संकटात ग्राहकांना आणखी एक शॉक
- करोनाच्या संकटातून दुसरं लॉकडाऊनही संपलं
- उद्यापासून बिलांची वसुली मोहीम राबविण्याचे आदेश
लॉकडाउनच्या काळात दुकाने, उद्योगधंदे, व्यापार ठप्प असल्यामुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवलं. अशातच महावितरणने भलीमोठी बिल पाठवून नागरिकांना आणखी आर्थिक संकटात टाकलं. यामुळे सत्ताधाऱ्यांनी वीजबिल माफीची पुडी सोडली आणि लोकांना आव्वाच्या सव्वा बिलं आली. लॉकडाऊन संपताच महावितरणाने शक्कल लढवून लोकांकडून बिलांची वसुली करून घेतली. कधी मीटर बंद तर कधी डीपी बंद करून लोकांकडून बिलं वसूल करण्यात आली.
आता दुसरं लॉकडाऊनही संपलं आहे. त्यामुळे उद्यापासून थकित बिलं वसूल करण्याचे आदेश महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लॉकडाऊन उठलं असलं तरी नागरिक अजूनही आर्थिक संकटातून सावरले नाहीत. अशात आता महावितरण बिलांसाठी मागे लागल्यामुळे नागरिकांना शॉक बसणार हे नक्की.