Home शहरे अकोला ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासंदर्भात अवादा कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासंदर्भात अवादा कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

0
ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासंदर्भात अवादा कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 31 : ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासंदर्भात अवादा कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, असीमकुमार गुप्ता, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, विनित मित्तल उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या क्षेत्रातील नवीन उद्योग असल्याने यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

अवादा कंपनी ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन अपारंपरिक ऊर्जेद्वारे निर्माण करण्यावर भर देत आहे. प्रकल्पात ऊर्जेचा वापर होणार असल्याने हा पर्यावरणपूरक प्रकल्प असेल. जागतिक हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र बनण्याचे ध्येय देशाने ठेवले आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत हरित हायड्रोजन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक चालना देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

——0000——