Home शहरे औरंगाबाद घनसावंगी तालुक्यातील सौ. शितलताई बापूराव चौरे यांना मेंदूच्या आॅपरेशन साठी अत्यंत वाईट परिस्थितीत मिळाले प्रहार चा आधार

घनसावंगी तालुक्यातील सौ. शितलताई बापूराव चौरे यांना मेंदूच्या आॅपरेशन साठी अत्यंत वाईट परिस्थितीत मिळाले प्रहार चा आधार

0

अंबड :- प्रतिनिधी | जुबेर पटेल , जालना ःघनसावंगी तालुक्यातील पिपरखेड येथील सौ. शितलताई बापूराव चौरे रा. पिंपरखेड ता.घनसावंगी जि.जालना यांच्या मेंदूच्या आॅपरेशन साठी आेरीआॅन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल आैरंगाबाद येथे दि. 06/ 04 /2021 रोजी त्यांचा परिवाराच्या वतीने अॅडमिट करण्यात आले होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आॅपरेशन साठी लागणारा दवाखान्याचा खर्च त्याच्या साठी भरणे शक्य नव्हते. सौ.शितलताई बापूराव चौरे व त्यांचे भाऊ श्री.भाऊसाहेब सानप यांनी जुबेर पटेल (प्रहार रूग्ण सेवक अंबड) व रुग्णसेवक श्री. राजेंद्र गायकवाड साहेब (तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अंबड) यांच्याशी संपर्क साधला. राजेंद्र गायकवाड साहेबांनी राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांचे स्विय सहाय्यक मयूर दादा महाजन यांच्या शी संपर्क साधून, मुख्यमंत्री सहायता निधी तून तीस हजार रूपये (30000 रूपये) रक्कम आॅपरेशन साठी मंजूर करून निधी प्राप्त करून दिला.

दि. 07/ 04/2021 रोजी आैरंगाबाद येथे सौ. शितलताई बापूराव चौरे यांचे यशस्वीपणे आॅपरेशन झाले. सौ. शितलताई बापूराव चौरे व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी राज्यमंत्री वंदनीय बच्चू भाऊ कडू व स्विय सहाय्यक मयूर दादा महाजन राजेंद्र गायकवाड साहेब (तालुकाध्यक्ष अंबड), जुबेर पटेल (प्रहार रूग्ण सेवक अंबड) आदींचे अगदी मनापासून आभार मानले. रूप सेवा हीच ईश्वर सेवा