पुणे : परवेज शेख घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व मा.अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे आदेशाने तसेच मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं.७५०/१९ भादविकाक. ४१७,३८० प्रमाणे दिनांक
१७/०८/०१९ रोजी गुन्हा दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना, स्थानिक गुन्हे शाखेतील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड,
सफौ.दत्तात्रय गिरीमकर,उमाकांत कुंजीर,सचिन गायकवाड, ,विजय कांचन, जनार्दन शेळके, राजु मोमीन,धिरज जाधव, अक्षय नवले असे वाघोली परिसरात पेट्रोलींग करीत असताना,

बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाघोली परिसरात घरफोडी करणारे इसम नामे राहुल गायकवाड व भरत स्वामी हे दोघे
सध्या आव्हाळवाडी फाटा, वाघोली येथे आलेले आहेत. सदर बातमीनुसार पथकासह आव्हाळवाडी फाटा येथे जावून मिळाले बातमीप्रमाणे
दोन संशयित इसमाना ताब्यात घेवून त्याचे नाव व पत्ता विचारता, त्यांनी त्यांची नावे राहूल यमनप्पा गायकवाड वय २१ वणे, रा.गारूड
वस्ती, डी.वाय.पाटील कॉलेज पाठीमागे, लोहगाव, पुणे व भरत संजय स्वामी, वय १९ वर्षे, रा.संतनगर, शांती होडा शोरूम मागे, ससाणे
हाडस, लोहगाव, पुणे अशी सांगितली. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी पायगुडे वस्ती, वाघोली येथे घरफोडी केल्याचे निष्पन्न
झाले. घरफोडीबाबत अधिक विचारपुस करता, त्याचेकडे गुन्हयातील मालमत्ता ही त्याचे ओळखीचे इसम नामे विनोद गणेश सिंग, वय ३४
वर्षे, रा.धानोरी गावठाण पाण्याच्या टाकीजवळ, पुणे यावेमार्फत त्याचे ओळखीचे इसम नामे उपेंद्र शिवपूजन राम, वय २४ वर्षे, रा.अमनोरा
पार्क लेबर कॅम्प रूम, हडपसर, पुणे यास विक्री केलेचे निष्पन्न झाले आहे. सदरचे गुन्हेगार हे सराईत असून त्याचेवर विविध पोलीस स्टेशन
मध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदर वर नमूद आरोपीतांनी पुणे व परिसरात मालमत्तेविषयक अधिक गुन्हे केल्याची दाट शक्यता असून त्याबाबत अधिक तपास
लोणीकंद पोलीस स्टेशन करीत आहे.






















WhatsApp