Home गुन्हा घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस युनिट ४ च्या पोलिसांनी केली अटक

घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस युनिट ४ च्या पोलिसांनी केली अटक

0


पुणे : परवेज शेख घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस युनिट ४ च्या पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या आईला पार्किन्सन्सचा आजार असल्याने त्यांच्या देखभालीसाठी शिवकृपा नर्सिंग ब्युरो अँड सर्जिकल येथून ४

केअरटेकर मागवल्या होत्या. ९० हजाराच्या ३० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १५ हजाराची ५ ग्रॅमची एक सोन्याची अंगठी व ६६ हजार रूपयाची २२ ग्रॅमची एक सोन्याची माळ आदी १ लाख ७१ हजार रूपयाचा माल चोरीला गेल्याने युनिट ४ गुन्हे शाखेचे पोलिस नाईक दत्तात्रय फुलसुंदर व विशाल शिर्के यांना माहिती मिळाली की सदर चोरी केअरटेकर महिलेपैकी एकीने केली आहे. तिला शिपाई जाधव गुन्हे शाखा यांच्या मदतीने पोलिस ठाण्यात आणले असता कृष्णा घोडे (वय २२, रा. औंध) याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यावर कृष्णाला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन सोन्याच्या बांगड्या सिद्धार्थ ज्वेलर्स (चिखली), सोन्याची अंगठी चामुंडा ज्वेलर्स (आळंदी), सोन्याची मणीमाळ स्नेहा ज्वेलर्स, बीड येथे विकल्याचे कबूल केले. ९० हजाराच्या ३० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १५ हजाराची ५ ग्रॅमची एक सोन्याची अंगठी व ६६ हजार रूपयाची २२ ग्रॅमची एक सोन्याची माळ आदी १ लाख ७१ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी गुन्हेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी, निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक शिसाळ, कर्मचारी दत्तात्रय फुलसुंदर, विशाल शिर्के शंकर पाटील, राजू मचे, हनुमंत बोराटे, शितल शिंदे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम यांनी केली आहे.