Home ताज्या बातम्या घराचे हप्ते भरण्यासाठी पैसाची मागणी करत पत्नीला मारहाण; पति वर गुन्हा दाखल

घराचे हप्ते भरण्यासाठी पैसाची मागणी करत पत्नीला मारहाण; पति वर गुन्हा दाखल

0

घराचे हप्ते भरण्यासाठी पैसाची मागणी करत पत्नीला मारहाण; पति वर गुन्हा दाखल*
घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत पत्नीला मारहाण करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 31) सायंकाळी जय गणेश साम्राज्य भोसरी येथे घडली. संतोष शिवदास सावंत (वय 46, रा. जय गणेश साम्राज्य, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

याप्रकरणी सविता संतोष सावंत (वय 40) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे आणण्याची मागणी आरोपी संतोष याने पत्नी सविता यांच्याकडे केली. तसेच सविता आणि त्यांच्या मुलीला घरातून चालते व्हा, अशी धमकी दिली. सविता यांनी घराच्या बाहेर जाण्यास नकार दिला.

यावरून चिडलेल्या पतीने सॅंडलच्या हिलने मारले. यामध्ये सविता यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.