Home गुन्हा घराच्या छतावरून पडून महिला अभियंता तरूणीचा मृत्यू

घराच्या छतावरून पडून महिला अभियंता तरूणीचा मृत्यू

देवरी (गोंदीया): घराच्या छतावरून पडून गंभीर जखमी झालेल्या अभियंता तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास देवरी तालुक्यातील सावली येथे घडली. दीक्षा देवनाथ बिंझलेकर (वय-२४) असे मृत्यू झालेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा ही आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कामानिमित्त घराच्या छतावर गेली होती. घराच्या छतावरून तिचा तोल गेल्याने ती खाली पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तात्काळ मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

दीक्षा ही अभियंता असून ती नागपूर येथील एका खासगी कंपनीत कामाला असल्याचे सांगण्यात आले. दक्षी हिचा एप्रिलमध्ये गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील एका युवकाशी साखरपुडा झाला होता. दीक्षा हिच्या मृत्यूमुळे सावली गावात शोककळा पसरली आहे.