पुणे : परवेज शेख महिलेस घरात जावुन चाकुचा धाक दाखवुन तिचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा करणाऱ्या दोन आरोपींना १२ तासात अटक करण्यात यश महिला फिर्यादी नामे सौ. शोभा देवानंद कठारे, वय ५२ वर्षे ,व्यवसाय – सेल्सवुमन (आईस्किम पार्लर ) रा.कामठे वाडा ५३० शुक्रवार पेठ पुणे हया काल दिनांक
१८/१०/२०१९ रोजी रात्री ११/०० वा सुमारास त्यांचे लिओ आईस्क्रिम पार्लर शुक्रवार पेठ पुणे हे दुकाना बंद करुन घरी आले, घराचा दरवाजा पुढे लोटुन त्या स्वयंपाक घरात भाजी चिरत असताना त्यांचे पाठीमागुन अचानक दोन अनोळखी इसम आले, त्यापैकी एकाने “तुमचे मिस्टर किती वाजता घरी येतात” असे हिंदी मध्ये विचारले. दुस-या इसमाने तात्काळ त्यांचे तोंड दाबुन पैसे व दागिने कुठे ठेवले आहे असे विचारले.
गुन्हा घडलेले घटनास्थळाचे आजुबाजुस असलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेरे, तेथील राहणारे स्थानिक लोकांकडे, तपास करीत असतांना आरोपींचे बाबत कोणताही पुरावा हाती लागत नसतांना पोलीस कर्मचारी राकेश क्षीरसागर व समीर माळवदकर यांनी जवळपास २५ ते ३० लोकांकडे पडताळणी करीत असतांना त्यांना मिळालेली माहिती सदरचे दोन इसम हे आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे येथे थांबलेले आहे, अशी मिळाल्याने बातमीच्या ठिकाणी जावुन त्यांना ताब्यात घेतले त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव १) सुनिल धर्मेश सरोज वय १९ वर्षे सध्या रा.आंबेडकर नगर, मार्केटयार्ड,पुणे मुळ रा.प्रतापगढ राज्य उत्तरप्रदेश २) अनिल गिर्दावाल सरोज वय १९ वर्षे रा.सदर असे सांगितले, त्याचेकडे गुन्हयाचे बाबत अधिक तपास करता, त्यांनी गुन्हा केलेल्याची कबुली दिल्याने त्यांना वरील गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे अधिक तपास करता, त्यांचेकडुन दाखल गुन्हयातील चोरलेले दोन सोन्याचे मंगळसुत्र, दोन मोबाईल फोन, दोन चांदीचे नाणे, रोख रक्कम असा एकुण ७४,५००/- रु किं चा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास खडक पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई ही डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्रीमती. स्वपना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री. प्रदिप आफळे ,सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री.उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी, अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, संदिप कांबळे, राहुल धोत्रे, रोहन खैर, रवी लोखंडे, योगेश जाधव विशाल जाधव, हिम्मत होळकर, इम्रान नदाफ, सागर केकाण यांचे पथकाने केली आहे.