पुणे, दि. १६ जुलै (परवेज शेख ) : घातक शस्त्रांच्या धाकावर दरोडा टाकणारी
गुन्हेगारांची टोळी जेरबंद करून मोका अंतर्गत तपास करून गुन्ह्यात चोरीस
गेलेली पूर्ण मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारीख २० सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी
१०.२०वा. च्या दरम्यान युनायटेड फायनान्स, व्हल्युअर गोल्ड लोन शॉप नं
३, आयरीश अपार्टमेंट पेट्रोल पंपच्या बाजूस, पीएमसी बँक जवळ, सेंट्रल
पार्क नालासोपारा (पूर्व) येथे शस्त्रांसह येऊन तेथील अधिकारी व कर्मचारी
यांना शस्त्रांचा धाक दाखवून १,७६,८७१३५/- रु.चे सोन्याचे दागिने व रोख
रक्कम घेऊन गेल्याची फिर्याद सुप्रज्ञा कदम (वय २४. रा. विरार पश्चिम)
यांनी नोंदवली आहे. यावरून तुळींज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात
आला आहे.
गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुप्त बातमीच्या आधारे तपास करून १०
जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपींनी इतर
साथीदारांच्या मदतीने यापूर्वीही असे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले
आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य पाहून आरोपीना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी
नियंत्रण अधिनियम प्रमाणे निलेश कौशिक, विशेष पोलीस महानिरीक्षक,
कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांच्या पूर्व परवानगीने समाविष्ट केली आहे.
दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक
गुन्हे शाखा, पालघर तसेच तुळींज पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांचे
एक पथक करून उक्त गुन्ह्यातील अटक आरोपींकडून गुन्ह्यात चोरीला
गेलेला माल व मिळालेला मोबदला यातून रक्कम व त्यातून खरेदी केलेली
मालमत्ता व सोन्याचे दागिने व सोन्याच्या लगडी असा एकूण ३ किलो ८११
ग्रॅम सोने, एक रिव्हॉल्वर, एक पिस्टल, ८ जिवंत काडतुसे, एक इनोव्हा
कार, एक प्रवासी रिक्षा असा एकूण १,८२,६४,१७५/- रु.चा माल हस्तगत
केला आहे.
सदर कारवाई पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे
अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी
अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे सहायक
पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस नाईक उमेश वरठा, किरण
म्हात्रे, वाल्मिक आहीरे, शिपाई सदानंद सावंत, पोलीस शिपाई राऊत तसेच
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक, सहायक पोलीस निरीक्षक
सुहास कांबळे, संतोष गुर्जर, सहायक फौजदार चंद्रकांत कदम, महादेव
वेदपाठक, हवालदार मंगेश चव्हाण, जनार्दन मते, संजय नवले, विकास
यादव, पोलीस नाईक रमेश अलदर, प्रशांत पाटील, मुकेश तटकरे, गोविंद
केंद्रे, शिवाजी पाटील, सागर बारवकर, अमोल तटकरे, प्रशांत ठाकूर, मनोज
सकपाळ, शिपाई शरद पाटील, अश्विन पाटील, अमोल कोरे यांनी केली
आहे.