पुणे : प्रतिनिधी
पुणे चंदन नगर परिसरात हॉटेल बार नियम धाब्यावर ठेवून रात्री बराच वेळ हॉटेल चे म्युझिक सिस्टम व हॉटेलमध्ये येजा करणाऱ्या ग्राहकाची वर्दळीचा धिंगाणा सुरू असतो व ह्या घटनेकडे मुळे स्थानिक पोलिस स्टेशनचे व गुन्हे शाखेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असते हे सिद्ध होत आहे. तेथील परिसरातील स्थानिक नागरिकांना नेहमी या सर्व त्रासाला सामोरे जावे लागते , चंदन नगर बायपास व संबंधित परिसरात गुन्हेगारीच्या गंभीर घटना बऱ्याच वेळा घडलेल्या आहेत अशा पार्श्वभूमीवर अवैद्य रीत्या सुरु असणारे हॉटेल व बार राष्ट्रीय महामार्ग लगतचे बार सर्रासपणे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात यावर स्थानिक पोलिसांचे किंवा संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे हे प्रत्यक्षदर्शीनी बघण्यास मिळाले. आज रात्री दर्शन पोलीस टाईम क्राईम टीम प्रतिनिधी कडून या संबंधित प्रकरणाची पाहणी करून सदर धक्कादायक प्रकार व खळबळजनक उघडकीस आले आहे. या हॉटेल मालकानं कडून उत्पादन शुल्क (GST) या नावाखाली ग्रराहकान कडून
बेहिशोबी बिल घेतले जात आहे , याबाबत हॉटेल चा काऊंटर बिल घेणाऱ्या व जबाबदार व्यक्तीस विचारले असता उडवा- उडविची उत्तर देऊन ग्राहकांना दमबाजी करून चुकीचे बिल वसूल केले जाते.
तरी प्रशासनाने व या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित योग्य ती कारवाई करून परिसरात शाकीय नियमांची सुव्यवस्था कायम ठेवून तेथील रहिवासी व नागरिकांना सुरक्षिता कायम ठेवावी.
या घडत असलेल्या प्रकाराची माननीय पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर यांचा कडून त्वरित दखल घेण्यात यावी .
संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे अशा प्रकारची अवैद्य धंदे व गुन्हेगारी पुणे शहरात वाढविण्यास मदत होत आहे. यामुळे पुणे पोलीस दलाचे उत्कृष्ट करत असलेल्या कामास गालबोट देखील लागत आहे तरी अशा अकार्यक्षम पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा वर वरिष्ठ अधिकाऱ्यांन कडून त्वरित कारवाई करण्यात यावी ही सामान्य जनते कडून पोलीस प्रशासना कडे मदतीची आशा आहे.