Home मनोरंजन ‘चंदा’ची व्यक्तिरेखा साकारताना थोडंसं दडपण होतं, पण… माधुरी पवारनं सांगितला अनुभव

‘चंदा’ची व्यक्तिरेखा साकारताना थोडंसं दडपण होतं, पण… माधुरी पवारनं सांगितला अनुभव

0
‘चंदा’ची व्यक्तिरेखा साकारताना थोडंसं दडपण होतं, पण… माधुरी पवारनं सांगितला अनुभव

[ad_1]

मुंबई: ” ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सध्या मालिकेत कोर्टरुम ड्रामा सुरू आहे. कोर्टात आर्या या निष्णात वकिलाविरुद्ध अजितकुमार त्याची बाजू अत्यंत निर्भिडपणे मांडतो आणि तो देवीसिंग नसून डॉक्टर अजितकुमार देव आहोत हे सगळ्यांना पटवून देतो.

ठोस पुराव्यांअभावी कोर्टदेखील अजितकुमारची सुटका करणार असतं. पण या सगळ्यात आता एका नवीन चेहऱ्याची मालिकेत एंट्री होणार आहे. चंदा ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही भूमिका अभिनेत्री निभावणार आहे.

या भूमिकेविषयी ती म्हणाली, ‘देवमाणूस ही मालिका अत्यंत रंजक वळणावर असताना चंदा या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून माझी एंट्री होतेय. चंदा आणि देवीसिंग हे एकमेकांना ओळखतात; पण ते एकमेकांना कसे ओळखतात आणि त्यांचा काय संबंध आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. चंदा ही एका वेगळ्या शैलीची व्यक्तिरेखा असून ती निभावताना थोडंसं दडपण होतं. पण संपूर्ण टीमनं मला सांभाळून घेतलं.’

[ad_2]

Source link