Home बातम्या ऐतिहासिक चंद्रपुरात जिल्हाधिकाऱ्यांची मतदान प्रशिक्षण केंद्राला भेट

चंद्रपुरात जिल्हाधिकाऱ्यांची मतदान प्रशिक्षण केंद्राला भेट

0
चंद्रपुरात जिल्हाधिकाऱ्यांची मतदान प्रशिक्षण केंद्राला भेट

चंद्रपूर, दि. ९ : ७१ – चंद्रपूर विधानसभा मतदार संघात नियुक्त मतदान कर्मचाऱ्यांच्या कॉर्मेल अकॅडमी येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन मतदान पथकांना 19 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्वांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे अचूक कामकाज करावे. उन्हाळा असल्याने आपली स्वतःची व मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांची काळजी घ्यावी.  मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था, पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर आदी बाबी असणे गरजेचे आहे. तसेच तापमान जास्त असल्यामुळे मतदारांना सावलीकरीता पेंडॉलची व्यवस्था करण्यात यावी, ईव्हीएम योग्य पद्धतीने हाताळावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. या प्रशिक्षणात मतदान पथकांना निवडणूक प्रकियेची सविस्तर कायदेशीर माहिती देण्यात आली. तसेच ईव्हीएम हाताळणीसाठी हॅन्डस् ऑन ट्रेनिंग देण्यात आले. मतदान कर्मचा-यांसाठी पोस्टल मतदान कक्ष सुरु होता.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी कोमल मुनेश्वर व त्यांचे पथक आदी उपस्थित होते.

०००