Home बातम्या ऐतिहासिक चंद्राच्या कक्षेमध्ये “चांद्रयान-2’ची नियोजित हालचाल यशस्वी 7 सप्टेंबरला विक्रम लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार

चंद्राच्या कक्षेमध्ये “चांद्रयान-2’ची नियोजित हालचाल यशस्वी 7 सप्टेंबरला विक्रम लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार

0

बेंगळूरु: ‘चांद्रयान-2′ ने चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचल्यावर काल ‘विक्रम’ लॅन्डर यशस्वीपणे वेगळे केले होते. यानंतर ‘चांद्रयान-2’च्या अपेक्षित हालचाली नियोजनानुसारच सुरू असल्याचे आज निष्पन्न झाले आहे. चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचल्यावर ‘चांद्रयान-2’ची पुढील हालचाल नियोजनानुसारच होणे हे चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचण्याइतकेच महत्वाचे आहे. ‘इस्रो’च्या नियोजनानुसार ‘चांद्रयान-2′ चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील पृष्ठभागावर 7 सप्टेंबरला उतरणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी ‘चांद्रयान-2′ ची आणखी एक नियोजित हालचाल बुधवारी होणे अपेक्षित आहे.आज सकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 8 वाजून 50 मिनिटांनी ‘चांद्रयान-2’ची नियोजित अपेक्षित हालचाल झाली, असे ‘इस्रो’ने म्हटले आहे. ‘चांद्रयान-2’वरील ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टीमच्या आधारे ही नियोजित अपेक्षित हालचाल घडवून आणली गेली. केवळ 4 सेकंदांची ही नियोजित अपेक्षित हालचाल होती, असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.

‘विक्रम’ लॅन्डरची कक्षा 104 किमी बाय 128 किमी इतकी आहे. ‘चंद्रयान-2′ ऑर्बिटर विद्यमान कक्षेत चंद्राची परिक्रमा सुरू ठेवत आहे. ऑर्बिटर व लॅंडर दोन्ही सुरक्षित आहेत, असेही ‘इस्रो’ने म्हटले आहे. पुढील कक्षेबाहेरील हालचाल 4 सप्टेंबर रोजी दुपारी 03:30 ते 04:30 वाजता दरम्यान होणार आहे.

‘विक्रम’ 7 सप्टेंबर रोजी सकाळी 1:30 ते अडीच दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर खाली येईल अशी अपेक्षा आहे. ते खाली आणण्यासाठी विक्रम लॉंडरच्या आणखी दोन चंद्राच्या कक्षेतील नियोजित हालचाली अपेक्षित आहेत. त्यानुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरण्याच्या तयारीची योजना आखण्यात आली आहे.
चंद्रावरील नियोजित सुखरूप लॅंडिंग हा एक भयानक क्षण ठरणार आहे. कारण यापूर्वी इस्त्रोने हे कधीही केले नव्हते. ‘चंद्रयान -1′ मोहिमेदरम्यान ‘एलओआय’ची युक्ती यशस्वीरित्या पार पाडली गेली होती, असे इस्रोचे अध्यक्ष के. शिवान म्हणाले आहेत.

लॅंडिंगनंतर, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान लॅंडर ‘विक्रम’ येथून ‘प्रज्ञान’रोव्हर बाहेर येईल आणि चंद्रावरील एक दिवसासाठी बाहेर भ्रमंती करेल. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांसमान असतो.