Home शहरे उस्मानाबाद चक्रीवादळात घराबाहेर पडूनका : पोलीस अधीक्षकांचे आवाहन

चक्रीवादळात घराबाहेर पडूनका : पोलीस अधीक्षकांचे आवाहन

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ३ जून : आज बुधवारी ३ जून रोजी ‘निसर्ग चक्रीवादळ’ महाराष्ट्रातील कोकण किणारपट्टीवर  घोंगावत आहे. काही प्रमाणात ते नाशिककडे सरकले आहे. आपल्या उस्मानाबाद जिल्हा परिसरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यातून बचावासाठी शक्यतो नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जनतेने आपल्या घरात सुरक्षीत रहावे. विनाकारण घरा बाहेर पडू नये. आपली जिवीत व वित्त हानी होनार नाही या दृष्टीने सतर्क रहावे. विज वाहीनी, खांब, तारा तुटल्या असल्यास त्यांस न हाताळता संबंधीत विज कार्यालयास कळवावे. वृक्ष उन्मळुन पडल्यास, पाणी तुंबल्याने रस्ता बंद झाल्यास त्याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, अग्निशमन विभाग, पोलीस किंवा सार्वजनिक बांधकाम खाते इत्यादी ठिकाणी कळवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी जिल्ह्यातील जनतेस केले आहे.