चर्चा तर होणारच! सायली संजीवच्या फोटोवर CSKच्या प्रसिद्ध खेळाडूने केली कमेंट

चर्चा तर होणारच! सायली संजीवच्या फोटोवर CSKच्या प्रसिद्ध खेळाडूने केली कमेंट
- Advertisement -


मुंबई: ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री सायली संजीवचे देशभरात असंख्य चाहते आहेत. मराठी मालिकांनंतर सायली मराठी चित्रपटांध्येही यशस्वी पदार्पण केलं. लवकरच ती झिम्मा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

सायली नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो शेअर करत असते. तिने नुकताच एक फोटो शेअर केला. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आणि लाइक्सचा वर्षाव केला. असं असं तरी एका कमेंटची मात्र सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज यां संघातील सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने सायलीच्या फोटोवर कमेंट केली आहे. ऋतुराजने सायलीच्या फोटोवर “Woahh” अशी कमेंट केली आहे. यानंतर चर्चा झाली नसती तरंच नवलंच.


सायलीच्या कामासंदर्भात बोलायचं झालं तर तिच्या ‘झिम्मा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता आणि त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा सायलीच्या नावाचीच सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरू आहे. याला कारण आहे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला सायलीचा बोल्ड सीन होता.





Source link

- Advertisement -