Home ताज्या बातम्या चांद्रयान-2″चे ऑर्बिटरद्वारे विक्रम लँडरसोबत 20 सप्टेंबरपर्यंत संपर्क होईल; ख्यातनाम ज्योतिषचार्याची भविष्यवाणी

चांद्रयान-2″चे ऑर्बिटरद्वारे विक्रम लँडरसोबत 20 सप्टेंबरपर्यंत संपर्क होईल; ख्यातनाम ज्योतिषचार्याची भविष्यवाणी

0

चांद्रयान-2″चे ऑर्बिटरद्वारे विक्रम लँडरसोबत 20 सप्टेंबरपर्यंत संपर्क होईल; ख्यातनाम ज्योतिषचार्याची भविष्यवाणी

चांद्रयान-2’ या इस्रोच्या सर्वात महत्वाच्या मोहिमेवर साऱ्या जगाचे लक्ष आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्यानंतर साऱ्या देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑर्बिटरद्वारे विक्रम लँडरसोबत संपर्क पुन्हा प्रस्थापित व्हावेत यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करत आहेत, त्यांनी आशा सोडलेली नाही. असे चित्र असतानाच आता वैदिक ज्योतिषांनी देखील मोठी भविष्यवाणी करत विक्रम लँडरसोबत संपर्क होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चांद्रयान-2 मोहीम 100 टक्के यशस्वी होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

विज्ञान फल ज्योतिष्य किंवा वैज्ञानिक आधार नसलेल्या भविष्यवाणीला मानत नाही. मात्र असे तरी जगभरातून अंक ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. ख्यातनाम ज्योतिषाचार्य अनिरुद्ध कुमार मिश्रा एक वैदिक ज्योतिषी आहेत जे वैदिक संख्याशास्त्र आणि आकलन यांच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी अंदाज वर्तवतात. त्यांनी आता चांद्रयान-2 मोहिमेसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. ज्यामुळे वैदिक ज्योतिष मानणाऱ्या वर्गाचा आनंद द्विगुणित झाला आहे. तर सकारात्मक विधानाचे स्वागत देशभरातून होत आहे.

विक्रम लँडरसोबत संपर्क प्रस्थापित होईल अशी भविष्यवाणी करतानात त्यांनी निश्चित वेळ देखील सांगितली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणातात की, ‘माझ्या गणनपद्धतीनुसार 20 सप्टेंबरपर्यंत विक्रम लँडरसोबत संपर्क होईल, अशा शक्यता अधिक आहेत. इस्रोच्या वैज्ञानिकांना यासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक प्रयत्न करावे लागतील’. हिंदुस्थानी जनतेने त्यांच्या विधानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

विक्रम लँडर 6 आणि 7 सप्टेंबर दरम्यानच्या मध्यरात्री चंद्रावर उतरणार होते. मात्र विक्रम लँडरच्या लँडिंगवेळी अवघे 2.1 किमी अंतर शिल्लक असताना संपर्क तुटला. त्यानंतर रविवारी ऑर्बिटरने विक्रम लँडर सुरक्षित असल्याचे फोटो इस्रोला धाडले आणि देशात पुन्हा आनंदाची लाट उसळली.