Home गुन्हा चाकण पोलिसांची कामगिरी.वाहनचालकाकडून बेकायदा पिस्तूल जप्त दोघांना ठोकल्या बेड्या

चाकण पोलिसांची कामगिरी.वाहनचालकाकडून बेकायदा पिस्तूल जप्त दोघांना ठोकल्या बेड्या

0

पुणे : परवेज शेख

पुणे-नाशिक महामार्गावर दारुच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवण्याऱ्यास पोलिसांनी मेदनकरवाडी येथे थांबवले. त्याच्या कारची तपासाणी केली असता कारच्या डॅशबोर्डमध्ये बेकायदा पिस्तूल आढळून आल्याने चाकण पोलिसांनी सोमवारी (दि. 12) बेड्या ठोकल्या आहेत.

सागर गोविंदा वरुडे (वय 30, रा. पिंपळे गुरव, पुणे) व रामकिसन दशरथ लहासे (वय 45, रा. रहाटणी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर वरुडे हा मद्यप्राशन करून भरधाव वेगाने कार पळवत होता.त्यामुळे चाकण पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कारचा पाठलाग करून कार मेदनकवाडी हद्दीत अडवली. त्याच्याकडे अधिक चौकशी करून कारची तपासणी केली असाता त्यामध्ये 25 हजार रुपये किमतीचे विनापरवाना पिस्तूल आढळून आल्याने पोलिसांनी ते जप्त केले. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.