Home शहरे मुंबई चाचणी अहवाल २४ तासांत

चाचणी अहवाल २४ तासांत

0
चाचणी अहवाल २४ तासांत

[ad_1]

म. टा विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकार आणि महापालिकेने उपाययोजनांचा वेग वाढवला आहे. करोनाची दुसरी लाट आणखी काही काळ राहिल्यास किंवा तिसरी लाट आल्यास मुंबई महापालिका काय करणार आहे, तसेच सध्या काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आराखडा पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महापालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त व अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीत संबंधित आयुक्तांनी आपल्या पालिका क्षेत्रातील करोना स्थिती तसेच उपाययोजनांची माहिती दिली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील महत्त्वपूर्ण सूचना केल्या. जम्बो केंद्र किंवा फिल्ड रुग्णालय, सरकारी व खासगी रुग्णालयांचे अग्निसुरक्षा, बांधकाम, विद्युत उपकरणाचे सुरक्षा ऑडिट करून घ्या, असे त्यांनी सांगितले. तर टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी यांनी सौम्य व लक्षणविरहित रुग्णांची प्रकृती अचानक ढासळत जाणे, रुग्णालयात उशिरा दाखल करणे यामुळे मृत्यू दर वाढल्याचे सांगून रेमडिसिवीर, स्टिरॉइड्सचा वापर, प्लाझ्माची नेमकी उपयुक्तता, विशेषत: रात्रीच्या वेळी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे नमूद केले. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे. रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई महापालिकेचे नियोजन

– खासगी प्रयोगशाळांना २४ तासांच्या आत चाचणी अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांवर तातडीने औषधोपचार करता येतील. तसेच आवश्यक वाटल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी कुठे पाठवायचे याचीही वर्गवारी करणे शक्य होणार आहे.

– मुंबईतील प्रत्येक प्रभागात वॉर्ड वॉर रूम असून त्याद्वारे नागरिकांशी संपर्क आणि समन्वय अधिक वाढवला जाणार आहे.

– पालिका, सरकारी, खासगी रुग्णालये आणि खासगी वैद्यकीय केंद्र यामार्फत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. याकरिता आणखी काही पावले तत्काळ उचलण्यात आली आहेत.

– बीकेसी येथील जम्बो कोविड केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रकृतीची व उपचाराची माहिती मोबाइल अॅपद्वारे दिली जाते. याच पद्धतीने अन्य केंद्रातही ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.

– मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभी राहणार असून, यामध्ये दोन हजार खाटा उपलब्ध होतील. यातील ७० टक्के खाटा ऑक्सिजन आणि २०० खाटा आयसीयूच्या असतील.

[ad_2]

Source link