Home गुन्हा चारित्रावर संशय घेऊन पत्नीला जिवंत जाळले, पत्नीची मुत्यूशी झुंज

चारित्रावर संशय घेऊन पत्नीला जिवंत जाळले, पत्नीची मुत्यूशी झुंज

0

उल्हासनगर: शहरातील भारतनगर मध्ये राहणाऱ्या आत्माराम पवार याने पत्नीच्या चारित्रावर संशय घेउन बुधवारी रात्री साडे बारा वाजता दारूच्या नशेत मारहाण करून अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. पत्नी सुमन 75 टक्के पेक्षा जास्त जळाली असून ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस फरार पती आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-4 येथील भारतनगरमध्ये राहणाऱ्या आत्माराम पवार(35) कुटुंबासह राहत होता. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी रात्री साडे बारा वाजता दारूच्या नशेत घरी आला. नेहमी प्रमाणे पत्नी सुमन हिच्या चरित्रावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करू लागला. संतापलेल्या आत्माराम याने घरातील डिझेल पत्नी सुमन हिच्या अंगावर टाकून आग लावली. सुमन हिच्या अंगाला आग लागताच जीवनाच्या आकांताने सैरभैर पळू लागली. शेजाऱ्यांनी अंगावर पाणी टाकून जीव वाचविण्याचा पर्यंत केला. 75 टक्के पेक्षा जळालेली सुमन ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात मुत्यूशी झुंज देत आहे.  

सुरवातीला शहरातील मध्यवर्ती रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सुमन पवार हिची तब्येत बिघडल्याने ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.  सुमन मुत्यूशी झुंज देत असून तिच्या जबानी नुसार विठ्ठलवाडी पोलीसानी पती आत्माराम पवार यांच्या विरोधात जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकाराने भारतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस फरार आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.