Home बातम्या व्यवसाय चार कंपन्यांचे भांडवल ८४,४३२ कोटींनी घटले

चार कंपन्यांचे भांडवल ८४,४३२ कोटींनी घटले

नवी दिल्ली : शेअर बाजारांच्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात खाल्लेल्या आपटीचा १० शीर्षस्थ कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या भांडवलास मोठा फटका बसला आहे. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज व स्टेट बँक या चार समभागांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात तब्बल ८४,४३२ कोटी रुपयांनी घटले. 

एचडीएफसीच्या दोन्ही समभागांना या घसरणीची सर्वाधिक झळ बसली आहे. एचडीएफसी बँक व एचडीएफसीच्या बाजार भांडवलात अनुक्रमे २६,९०० व २३,३६० कोटी रुपये घट झाली. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल २२,१२३ कोटी रुपयांनी घटले. 

दुसरीकडे, टीसीएसच्या (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) बाजार भांडवलात मात्र ११,९५१ कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यातील पाच सत्रांत मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात एकूण ४५४ अंकांची घसरण झाली.