Home बातम्या राष्ट्रीय चार दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकून आहे ‘सुजित विल्सन’; मोदींनी केली प्रार्थना

चार दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकून आहे ‘सुजित विल्सन’; मोदींनी केली प्रार्थना

0

तिरुचिराप्पल्ली: चार दिवसांपासून तामिळनाडूच्या तिरुचिराप्पल्ली जिल्ह्यातील गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय सुजित विल्सन याच्या बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत. बोअरवेलजवळ आतापर्यंत ६० फूट खड्डा खोदण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजित विल्सनविषयी ट्विट केले आहे. पीएम मोदी म्हणाले की, माझ्या प्रार्थना तरुण आणि धाडसी सुजित विल्सन यांच्याकडे आहेत.

नरेंद्र मोदी म्हणाले, मी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो. सुजितला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते सुरक्षित रहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुजित बोरवेलमध्ये पडला आणि ३० फूट खोल अडकला. त्यानंतर रात्री तो सुमारे १०० फूट आणखी खाली सरकत गेला.

दरम्यान, मदत पथकाने सुजितला बाहेर काढण्यासाठी आणखी १२ तास लागणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

ANI@ANI

Tamil Nadu: A pit has been dug up to 60 feet so far, near the borewell in Nadukattupatti, where operation is underway to rescue 2-yr-old #SujithWilson. Drilling by borewell drilling machine is complete, further drilling is being done by a rig machine.

View image on Twitter

1804:30 PM – Oct 28, 2019Twitter Ads info and privacy46 people are talking about this