मुंबई, दि. 16 : चार धाम यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये याकरीता मार्गदर्शक तत्वे जारी केली असून भाविकांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केल्याची माहिती उत्तराखंड शासनाच्या पर्यटन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागास पत्राद्वारे कळविली आहे.
चार धाम यात्रेकरीता देशभरातून श्रद्धाळू येतात. परंतु, अनेक भाविकांची योग्य मार्गदर्शनाअभावी गैरसोय होते, अनधिकृत ठिकाणांहून नोंदणी केल्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उत्तराखंड शासनाच्या पर्यटनविभागाद्वारे ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने राबविण्यास येत आहे. भाविकांसाठी registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर आणि Tourist Care Uttarakhand (Android/IOS) ॲपवर ही नोंदणीप्रक्रिया मोफत सुरु केली असून 01351364 हा टोल फ्री क्रमांकही दिला आहे.
भाविकांनी नोंदणीसाठी या अधिकृत मार्गाचा अवलंब करुनच यात्रा करावी, असे आवाहनही उत्तराखंड शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
000