Home शहरे औरंगाबाद चिंता वाढली;औरंगाबादेत आणखी दोन रुग्ण बाधित, बाधित रुग्णांचा आकडा 10 वर

चिंता वाढली;औरंगाबादेत आणखी दोन रुग्ण बाधित, बाधित रुग्णांचा आकडा 10 वर

औरंगाबाद – कोरोना व्हायरसने औरंगाबादकरांची चिंता वाढवली आहे. औरंगाबादेत आणखी दोन रुग्ण बाधित आढळले असून रुग्णामध्ये एका डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 10 वर पोहचली आहे. आज दुपारीच एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालीची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर परत एकदा कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसातच शहरातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने ही औरंगाबादसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.