Home शहरे मुंबई चिंता वाढली! डोळे, कानांना संसर्गाची भीती

चिंता वाढली! डोळे, कानांना संसर्गाची भीती

0
चिंता वाढली! डोळे, कानांना संसर्गाची भीती

[ad_1]

: संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डोळे व कानामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. करोनापश्चात टप्प्यावर मधुमेह असलेल्या काही रुग्णांमध्ये प्रसंगी डोळ्याच्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत.

मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. शशिकांत म्हसाळ यांनी अशा प्रकारचे रुग्ण करोनापश्चात टप्प्यामध्ये दिसून येत असल्याचे सांगितले. एका रुग्णाला अशा प्रकारे झालेल्या संसर्गामध्ये डोळा काढून टाकावा लागला आहे. स्टेरॉइडच्या अतिरेकी वापरामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ही गुंतागुंत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईच्या कान नाक घसा संघटनेचे प्रमुख डॉ. अजय डोईफोडे यांनीही अशा प्रकारच्या केसेस येत असल्याचे सांगितले. त्यामुळे स्टेरॉइडचा वापर काळजीपूर्वक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एका बारा वर्षांच्या मुलावरही नेत्रशस्त्रक्रिया करावी लागल्याचा अनुभव त्यांनी विषद केला.

मुंबईमध्ये या प्रकारच्या विषाणू संसर्गाच्या आकडेवारीमध्ये मागील लाटेच्या तुलनेत रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. यातील जवळपास सर्व रुग्णांना करोना संसर्ग झाला होता. करोनापश्चात टप्प्यामध्ये या संसर्गामध्ये अंधत्व, तसेच चेहऱ्याचा आकार बिघडण्याच्याही तक्रारी पुढे आल्या आहेत, असे डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.

[ad_2]

Source link