चिखलीत दारुच्या नशेत मारहाण करून दोघांकडून मित्राचा खून

- Advertisement -

पिंपरी : तीन मित्रांमध्ये दारुच्या नशेत वाद होऊन दोन मित्रांनी मारहाण केली. यात एका मित्राचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन मित्रांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू नामदेव राठोड (वय ३५, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. चेतन वाघमारे व आकाश इचके अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चिखलीचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कारभारी आहेर (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. 
चिखलीतील म्हेत्रेवस्ती येथे गुुरुवारी (दि. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास राजू राठोड, चेतन वाघमारे व आकाश इचके हे तिघे दारुच्या नशेत असताना त्यांच्यात वाद झाला. यात चेतन वाघमारे व आकाश इचके यांनी राजू राठोड याला ढकलून देऊन खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी त्याच्या छातीत, हातावर मारून त्याला गंभीर जखमी करून ठार मारले. 
दरम्यान, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे चेतन वाघमारे व आकाश इचके यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisement -