Home गुन्हा चिखली मध्ये लाखो रूपयांचा गुटखा जप्त चिखली पोलिसांची कामगीरी

चिखली मध्ये लाखो रूपयांचा गुटखा जप्त चिखली पोलिसांची कामगीरी

0

चिखली(बुलढाणा): प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यामधील राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाणारे चिखली शहरामध्ये  हळूहळू वरलीमटका व प्रतिबंध गुटका व्यवसाय गुटका माफिया चोरी चुपके चालवत असताना मागील काही महिन्या पूर्वी गुटका माफियांवर कारवाई करण्यात आली होती परंतु गुटका माफियांनी आपला धंदा पुन्हा सुरू केला असता आज एका ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून लाखोच्या प्रतिबंध गुटखा जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले तर मुख्य आरोपी फरार झाला आहे चिखली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खैरुशा बाबा दर्ग्याच्या परिसरात गुटका माफियाने शासन प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचे चोरून-लपून विक्री होत असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांना मिळाली असता  त्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.

त्या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास चिखली शहरात चोरून राज्य शासनाचे प्रतिबंध केलेल्या गुटखा विक्री करणाऱ्या अब्दुल निसार अब्दुल कादर यांनी खैरशा बाबा दर्ग्याच्या परिसरात गुटखा आणून जहीर खान अजाद खान यांच्या घरात लपवून ठेवला आहे अशी माहिती मिळाल्यावरून चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विक्रम काकड,नारायण तायडे,प्रकाश पाटील,राहूल मेहुणकर, पुरुषोत्तम आघाव, गजानन जाधव,सुनिता इंगळे,यांनी  धाड टाकले असता त्यासह जहीर खान आजद खान यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरामध्ये दोन मोठ्या पांढऱ्या व त्यामध्ये राज निवास सुगंधित पानमसाला व पांढऱ्या रंगाच्या गोण्या त्या उघडले असता त्यामध्ये शासन प्रतिबंधित केलेला गुटका मिळून आला आहे यावेळी घटना स्थळावरून अब्दुल निसार अब्दुल कादर हा व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे तर जहीर खान,अजाद खान,यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत सदर ताब्यात घेऊन पंचनामा करून सदर पोलीस स्टेशन चिखली येथे जमा करण्यात आला आहे चिखली पोलिसांनी या कारवाईची माहिती अन्न व औषध विभाग चे अधिकार्‍यांना कळविली असल्याचे सांगितले मात्र दैनिकात प्रकाशित  करण्यापर्यंत अन्न व औषध विभागाच्या अधिकारी चिखलीला फिरकले नव्हते तसेच दिनांक 16 सप्टेंबर रोजी देखील पोलिसांनी धाड टाकून 3 लाख 2 हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला होता तरी अन्न व औषध विभाग करते तरी काय यांच्यावर प्रश्नचिन्ह आहेत  अन्न व औषध विभागाचे अधिकारी केव्हा चिखली पोलीस स्टेशन मध्ये दाखल होऊन पुढील कारवाई करतील हे बघावे लागेल असे सर्वसामान्य जनतेतून आवाज आहे