चिनी वस्तू महाग होण्याची शक्यता

- Advertisement -

नवी दिल्ली :  चीनच्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लवकरच ४० ते ५० टक्के अतिरिक्त ‘जीएसटी’ आणि सीमाशुल्काचा भुर्दंड बसणार आहे. प्राप्तिकर विभागातर्फे चीनच्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या उत्पादनांवर ‘इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स’ अंतर्गत ब्लेंडेड फ्लॅट टॅक्स आणि  सीमाशुल्क लागू करण्याचा विचार करण्यात येत आहे. ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या अवैध वस्तूंना चाप लावण्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कर आकारण्यात येण्याची शक्यता आहे. हा कर चीनशी संबंधित वेबसाइटमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर आकारण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात सीमा शुल्क विभागाने ‘गिफ्ट रूट’च्या माध्यमातून देशांतर्गत बाजारात सादर झालेल्या अनेक शिपमेंट जप्त केल्या आहेत. कोणत्याही देशातून ५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीची भेटवस्तू मागविल्यानंतर त्यावर सीमा शुल्क भरावे लागत नाही. चीन आणि अन्य देशांच्या ई-कॉमर्स वेबसाइट या नियमाचा फायदा घेत आहेत. 

- Advertisement -