चीनच्या दादागिराने हैराण; जी-७’ राष्ट्र समूहाची वज्रमूठ

चीनच्या दादागिराने हैराण; जी-७’ राष्ट्र समूहाची वज्रमूठ
- Advertisement -


हायलाइट्स:

  • चीनविरोधात जी-७ राष्ट्रसमूह एकवटले
  • लंडनमध्ये जी-७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक
  • चीनविरोधात आघाडी करण्याबाबत चर्चा

लंडन: जी-७’ राष्ट्र समूहातील देशांनी मंगळवारी एकत्र येऊन चीनच्या एकाधिकारशाहीला कसे रोखता येईल, चीनविरोधात एकत्रितपणे आघाडी कशी उघडता येईल याबाबत चर्चा केली. समूहातील सहभागी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक आहे. या समूहामध्ये भारताचा समावेश नसला तरीही भारताला विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

‘जी ७’ ची बैठक

जगातील बड्या लोकशाही देशांनी चर्चेसाठी एकत्र यावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केल्यानंतर ब्रिटनने यंदाच्या परिषदेसाठी भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. ‘जी-७’ची मुख्य परिषद पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये होणार आहे. मात्र, सध्या याच देशांचे परराष्ट्रमंत्री ब्रिटन येथे चर्चेसाठी एकत्र जमले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री लंडनमध्ये ही बैठक सुरू झाली.

वाचा:…तर भारतात तीन महिन्यात करोना बळींची संख्या १० लाखांवर!

‘जी-७’च्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत मंगळवारी चीनची एकाधिकारशाही चर्चेच्या केंद्रस्थानी होती. चीनची वर्चस्ववादी लष्करी आणि आर्थिक धोरणे आणि त्याचा शेजारील देशांसह जगावर होणारा परिणाम याची चर्चा केली गेली. ‘चीनला थांबविण्याचा किंवा खाली खेचण्याचा आमचा प्रयत्न नाही,’ असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय मानके आणि नियमांनुसार कोणत्याही देशाचे वर्तन असावे, वैयक्तिक स्वार्थासाठी केली जाणारी एकाधिकारशाही कदापिही मान्य केली जाणार नाही. फक्त चीनच नव्हे; तर अन्य राष्ट्रांनी पण या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही अमेरिकेने केले. ‘हाँगकाँग आणि तेथील लोकशाहीसाठी जी वचने चीनने दिली आहेत, ती पाळावीत,’ अशी अपेक्षा ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी केली.

वाचा: ‘भारतात करोनामुळे गंभीर परिस्थिती; लष्कराची मदत घ्यावी’

बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा

‘जी-७’च्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान हे सात देश सहभागी झाले आहेत. म्यानमारमध्ये लष्कराची सुरू असलेली एकाधिकारशाही, इथियोपियातील संकट आणि अफगाणिस्तानातील तणाव यावर चर्चा होणार आहे. त्याशिवाय रशियातील सरकार आणि विरोक्षी नेते अॅलेक्सी नव्हल्नी यांचा मुद्दाही चर्चेत येणार आहे. जगभरातील करोनाची स्थिती आणि लसीकरण मोहिमा यावर चर्चा अपेक्षित असून, विविध देशांनी मदतीसाठी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक तापमानवाढ, लीबियातील अशांतता आदी मुद्द्यांवरही यंदा चर्चा व निर्णय होणे अपेक्षित आहे. इराण आणि उत्तर कोरिया या देशांच्या अणुकार्यक्रमावर चर्चा झाली. कोव्हिड साथरोगाच्या काळात कोणत्या प्रकारे परस्पर सहकार्य राबविता येईल, यावरही चर्चा झाली.

वाचा: करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर महिलांचा मृत्यू

‘जी-७’चे उद्दिष्ट काय?

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान हे सात देश एकत्र येऊन जागतिक आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करून, त्यावर उपाययोजना करण्याचे ठरवतात. जगातील आघाडीचे सात देश असल्यामुळे जगाचे नेतृत्व आपल्याकडे आहे, अशी त्यांची भावना असते. विविध प्रासंगिक विषयांवर चर्चा करून शांतता आणि विकासासाठी या परिषदेकडून प्रयत्न केले जातात.

पाहा: मेट्रो रेल्वेसह पूल कोसळला; २३ ठार, ७० हून अधिक जखमी

भूमिका काय?
जपान आणि चीन यांच्यातील ‘द्वंद्व’ ऐतिहासिक काळापासून सुरू आहे. इटली मात्र चीनच्या जवळचा देश म्हणून मानला जातो. २०१९ नंतर या दोन्ही देशांमध्ये दळणवळण आणि विकास आदान-प्रदान वाढल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अमेरिका, ब्रिटन या दोन्ही देशांची चीनविरोधात नाराजी आहे. विकसित देशांच्या या वार्षिक परिषदेत गेल्या वर्षी ‘अॅमेझॉन’च्या जंगलातील वणवा, ब्रेक्झिटची मुदत संपवणे, व्यापार तणाव कमी करणे आदी विषय चर्चिले गेले होते.



Source link

- Advertisement -