Home बातम्या आंतरराष्ट्रीय चीनमध्ये एकाच वेळी दिसले तीन सूर्य, तिप्पट होता सुर्यप्रकाश

चीनमध्ये एकाच वेळी दिसले तीन सूर्य, तिप्पट होता सुर्यप्रकाश

0

नवी दिल्ली : संपूर्ण जग जेव्हा नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होते तेव्हा चीनला निसर्गाचा एक वेगळा रंग पाहायला मिळला. एक अभूतपूर्व नैसर्गिक घटना त्यांना पाहायला मिळाली. चीनच्या उत्तरपूर्वी स्थित जिलिन प्रांतच्या फूयु शहरात 31 डिसेंबर 2019 ला एकाच वेळी तीन सूर्य दिसले होते. हे पाहून लोकांना हा चमत्कार वाटला. मात्र ही एक वैज्ञानिक घटना आहे. एका विशिष्ट परिस्थितीत ही अवस्था समोर येते. तर तीन सूर्य दिसण्याचे नेमके कारण काय?

फूयु शहरात पडला तिप्पट सूर्यप्रकाश 
31 डिसेंबर 2019 च्या सकाळी लोक नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होते. सकाळी जरा जास्तच प्रकाश पडलेला दिसला. लोक घराबाहेर पडले तेव्हा त्यांना आकाशात तीन-तीन सूर्य पाहायला मिळाले. यानंतर लोक रस्त्यावर येऊन सूर्य पाहू लागले. लोकांनी घराबाहेर पडून सूर्याचे फोटो घेतले.

कसे दिसत होते तीन सूर्य?
चीनच्या उत्तरपूर्वी येथील जिलिन प्रांतच्या फूयु शहरात जे तीन सूर्य एकाच वेळी दिसत होते. त्यामधील दोन अर्धे दिसत होते. तर मध्यभागी असलेला सूर्य हा परिपूर्ण होता. आजुबाजूला असलेल्या सूर्यामुळे मध्यभागी असलेल्या सूर्याच्या बाजूला उलटा इंद्रधनुष्य बनलेला दिसत होता.

20 मिनिट दिसले दृष्य
मुख्य सुर्यासोबत असणारे दोन अर्धे सूर्य जवळपास 20 मिनिटे आकाशात होते. यानंतर ते गायब झाले. यासोबतच सूर्यावर असलेला उलटा इंद्रधनुष्यही गायब झाला. वैज्ञानिक भाषेमध्ये याला सनडॉग म्हणतात.

सनडॉग म्हणजे काय?
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सनडॉगचा वेळ असतो. तेव्हा सूर्य आकाशात खूप खालच्या बाजूला दिसतो. किंवा आकाशात खूप जास्त ढग किंवा बर्फाचे कण असतात. या कणांवर जेव्हा सूर्य किरणं येऊन पडतात तेव्हा तुम्हाला तीन-तीन सूर्य दिसतात. तसेच यावर उलटे इंद्रधनुष्यही तयार होते.