चुरशीच्या लढतीत वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे 6500 मतांनी विजयी

- Advertisement -

चुरशीच्या लढतीत वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे 6500 मतांनी विजयी

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले दुसरे खातं उघडले आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी भाजपला शह देत विजय मिळवला आहे. या चुरशीच्या लढतीत सुनील टिंगरे यांनी 6500 मतांनी विजय मिळवला आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार जगदीश मुळक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनिल टिंगरे यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात होत. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनिल टिंगरे यांनी पहिल्या फेरी पासून विजयी आघाडी घेत भाजपला शह दिला आहे.

दरम्यान राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या जगदीश मुळुक यांनी 66 हजार 908 एवढी मते घेत विजय मिळवला होता. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे सुनील टिंगरे होते. त्यांना 61 हजार 583 मते मिळाली. आणि त्यांचा 5 हजार 325 मतांनी पराभव झाला होता.

- Advertisement -