पिंपरी चिंचवड ( रमेश कांबळे ) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे वाढतच असल्याने ,ही बाब पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे .परंतु खाकी वर्दी म्हटलं की करडी नजर , अशाच गुन्हे शाखा युनिट दोन आणि पाच च्या पोलीस पथकाच्या करड्या नजरेने वाहन चोरणार्या सराईत गुन्हेगारांना अटक केली .त्यांच्याकडून पाच मोटार आणि नऊ दुचाकी जप्त करून १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हे शाखा युनिट -२ कडून
१) आकाश उर्फ प्प्या राजेंद्र सांडभोर वय-२५ ( रा.संग्रामनगर झोपडपट्टी वटास्कीम निगडी ) २) सुजित उर्फ सुज्या भीमा गायकवाड ,वय-२७ (सनजयनगर ओटास्कीम निगडी पुणे ) या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.युनिट -२ च्या पोलीस पथकाने भक्ती शक्ती निगडी चौक येथे सापळा लावला असता ,चोरीच्या दुचाकीवरून फिरत असलेल्या या आरोपीना अलगद जाळ्यात अडकवले.गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार ,पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी ,केरआप्पा माने,प्रमोद वेताळ,दीपक खरात,वसंत खोमणे ,उषा दळे ,विपुल जाधव ,चेतन मुंढे ,जमीर तांबोळी ,जयंत राऊत ,अमित कुडके,नामदेव राऊत ,शिवाजी मुंढे ,अजित सानप आदींनी ही कामगिरी केली.

गुन्हे शाखा युनिट -५ च्या पोलीस पथकाने किवळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला सापळा लावला ,आणि चोरीच्या दुचाकीवरून किवळेेगावाकडे जात असलेल्या एका अल्पवयीन सराईतासह दोघांना ताब्यात घेतलं.
१) अक्षय दशरथ शिंदे वय-२० ( रा.पत्राशेड अजिंठानगर निगडी ) आणि एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.त्यांच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त केल्या.गुन्हे शाखा युनिट-५ पोलीस पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत ,सहायक पोलिस निरीक्षक राम गोमरे ,पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे,दत्तात्रय बनसूडे ,संदीप ठाकरे,मयूर वाडकर ,गणेश मालुसरे ,ज्ञानेश्वर गाडेकर,धनंजय भोसले,श्यामसुंदर गुट्टे , स्वामींनाथ जाधव, फारुख मुल्ला ,सावन राठोड ,नितीन बहिरट ,भरत माने,रामकुमार इधारे, दयानंद खेडकर ,गोपाळ ब्रम्हांदे ,व राजेंद्र कदम यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.
गुन्हे शाखा युनिट – २ आणि गुन्हे शाखा युनिट- ५ च्या पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावून ,एका अल्पवयीन मुलासह चार सराईत वाहन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी आणि ५ मोटार गाड्या अशा एकूण १४ चोरी केलेली वाहने जप्त केली.आणि १४ गुन्हे उघडकीस आणले.