Home गुन्हा चोरी करणारे तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चोरी करणारे तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0


पुणे : परवेज शेख दि.०६/०१/२०२० रोजी कोंढवा पोलीस ठाणे गु. र. नं. २०/२०२० भा. द. वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस शिपाई अजीम शेख व पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे यांना बातमी मिळाली की घरातली खिडकी उघडी असताना आरोपींनी खिडकीमध्ये हात घालून पर्स काढला पर्समध्ये एक मंगळसूत्र आणि 14,000 रुपये कॅश असा मुद्देमाल लांबविला सदर आरोपी हे मुद्दे मालाची विल्हेवाट लावत असताना खबर मिळाली नमूद आरोपीकडेे जाऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सर्व मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करून त्या तिन्ही आरोपींना अटक केली नमूद आरोपी तबरेज शब्बीर शेख दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा.श्री सुहास बावचे सो,पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5,मा.श्री.सुनील कलगुटकर सो,सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे,मा.श्री. विनायक गायकवाड सो.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे, श्री. महादेव कुंभार सो.पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक संतोष शिंदे , तसेच सहा.पो.फो इकबाल शेख , पो.ना.योगेश कुंभार ,पो.ना.पृथ्वीराज पांडुळे, पो.शि.अझीम शेख पोलीस शिपाई मोहन मिसाळ यांनी केली आहे.