चोरी गेलेले दागिने पकडले चोरास २४ तासाच्या आत

- Advertisement -

पुणे-परवेज शेख
कोरेगाव पार्क पो.स्टे. फिर्यादी महिला मरियम अब्दुल वालजी वय ६७ वर्षे रा-कोरेगावपार्क पुणे. या त्यांच्या पतीसह दोघेच घरी राहतात. याचा फायदा मोलकरणीने घेवुन, मोलकरीण नामे – राजश्री विनोद सावंत रा. १३ ताडीवाला रोड, पुणे हिने फिर्यादी यांच्या घरातील परस्पर २ लाख २७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. घटनेबाबतचा गुन्हा दाखल होताच, मंगलदास पोलीस चौकीच्या महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा टुले यांनी अत्यंत कौशल्याने सदर गुन्हयाचा तपास करून २४ तासाच्या आत चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत केले. नमुद गुन्हयाचा तपास मा.श्री. मदन बहाद्दरपुर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन व मा. श्री गणेश माने पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला पोलीस उप निरीक्षक चित्रा चौधरी , पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत गुरव, पो.हवा गोकावी. पो.हवा अर्जुन कांबळे. पो.शि. श्रीनाथ कांबळे यांच्या मदतीने करण्यात आला .सदर गुन्हयाचा पुढील तपास हा मनिषा टुले महिला पोलीस उपनिरीक्षक या करीत आहे.

- Advertisement -