Home शहरे औरंगाबाद चौदा वित्त आयोगाच्या निधी व इतर कामाच्या भष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच अय्युब पठाण

चौदा वित्त आयोगाच्या निधी व इतर कामाच्या भष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच अय्युब पठाण

पैठण प्रतिनिधी :- इम्तीयाज शेख

अंबड तालुक्यातील दुनगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून 14 वा वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार करून पैशाची अफरातफर केल्याची तक्रार उपसरपंच अय्युब पठाण यांनी लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना.जिल्हा अधिकारी जालना.ग्रामविकास अयुक्त औरंगाबाद.यांच्याकडे केली आहे.


अंबड तालुक्यातील दूनगाव येथील ग्रामसेवक‌ व सरपंच यांनी गावातील कोणालाही न विचारता व ग्रामसभा न घेता ग्रामपंचायत कार्यालयास सन 2017 पासून ते अत्तापर्यत जेवढा निधी प्राप्त झाला.त्याचा गैरवापर करून त्यामध्ये भष्टाचार करून कुठलेही विकास काम न करता बनावट इस्टीमेट तयार करुन चुकिच्या MB या तयार करून बिले उचलून घेतली असून शासनाच्या पैसाचा भष्टाचार केला आहे.तसेच प्रधानमंत्री स्वच्छालय योजनेत देखील कुठलेही स्वच्छालय न बांधता बिले उचलून भ्रष्टाचारा केला आहे.तसेच कोणतीही ग्रामसभा न घेता बोगस कामे दाखवुन बिले उचललेली आहेत.त्यामुळे कामाची चौकशी करण्यात यावी असे निवेदन दुनगावचे उपसरपंच अय्युब पठाण यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.