मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आदेश
मुंबई, दि. १९ : मुंबईतील जुहू येथील समुद्र किनारी दरवर्षी छट पूजा उत्सव साजरा करण्यात येतो. यानुसार यावर्षी दिनांक ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी छट पूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी ‘जुहू पोलीस स्टेशन’ व ‘सांताक्रुज पोलीस स्टेशन’ या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मद्यविक्रीची अर्थात दारूची दुकाने दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वाजतापासून विहित वेळेपर्यंत म्हणजेच दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत (११.३० तास) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
..
तरी जुहू व सांताक्रूझ पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व अबकारी परवानाधारकांनी आणि सर्व प्रकारची मद्यविक्री अनुज्ञप्ती धारक दुकाने यांनी सदर कालावधीत कोणतेही व्यवहार करू नये. या कालावधीत व्यवहार सुरू असल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यासह अनुज्ञप्ती वा परवाना रद्द करण्याची कारवाई देखील केली जाईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी कळविले आहे.
===
(क्र. मुउजि/प्रमाक/वा/००९)