छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठारसुकमा: छत्तीसगडच्या सुकमाजिल्ह्यातील कोंटा परिसरात आज सकाळी पोलिसांच्या डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. पोलीस अधिक्षक शलभ सिन्हा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कोंटा परिसरात नक्षलवाद्यांनी शहीद सप्ताहाचे आयोजन केले असून यावेळी मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी कोंटा परिसरात नक्षलवाद्यांनी शहीद सप्ताहाचे आयोजन केले असून यावेळी मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी घटनास्थळी पोहोचणार असल्याची खबर पोलिसांच्या डीआरजी जवानांना मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी ७ वाजताच पोलिसांच्या डीआरजी जवानांच्या टीमने कोंटा परिसराला घेराव घातला. त्यानंतर या जवानांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असता नक्षलवाद्यांनी या जवानांवर गोळीबार केला. मात्र जवानांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. जवानांची मोठी टीम पाहून नक्षलवाद्यांनी या परिसरातून पलायन सुरू केले असता दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.