मुंबई, दि.१: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, अभिनेते आदेश बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याच्या कायमस्वरूपी प्रतिकृतीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागे ही कायमस्वरूपी गड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे याच प्रतिकृतीच्या मागे मुंबा आईची प्रतिकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आल्यानंतर प्रवाशांना मुंबा आईचे दर्शन होणार आहे.