Home गुन्हा छातीत लोखंडी चॉपर खूपसल्याने व लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केल्यामुळे जागीच मृत्यू

छातीत लोखंडी चॉपर खूपसल्याने व लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केल्यामुळे जागीच मृत्यू

0

नाशिक :  दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव शिवारातील वागदर मळा येथे मागील भांडणाची कुरापत काढत पूर्व वैमनस्यातून बारा जणांच्या जमावाने एकाचा खून केला असल्याची घटना घडली असून, या घटनेने तालूक्यात खळबळ उडाली असून महिनाभरातील खुनाची दुसरी घटना आहे. दिंडोरी तालूक्यातील कोचरगाव येथील शिवाजी सुखदेव पारधी वय (25) या युवकाचा खून झाला असुन, दिंडोरी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करत बारा संशयितांना अटक केली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बारा जणांच्या जमावाने मागील भांडणाची कुरापत काढत शिवाजी सुखदेव पारधी वय 25 याच्या छातीत लोखंडी चॉपर खूपसल्याने व लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की नवरात्र उत्सवात देवी विसर्जनाच्या वेळी मयत शिवाजी सुखदेव पारधी हा कोचरगाव येथील देवीची मूर्ती ठेवलेली पिकअप गाडी चालवत होता. यावेळी आरोपी सोमनाथ याच्या गाडीला पिकअप गाडी चा कट लागल्यामुळे आप-आपपसात वाद होते. तेव्हापासून संशयित आरोपी सोमनाथ टोंगारे व मयत शिवाजी पारधी यांच्यामध्ये दुश्मनी निर्माण झालेली होती. या घटनेचा दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. काल रात्री संशयित आरोपी यांनी संगनमताने हल्ला केल्याने जागीच मृत्यू झाला. राजेंद्र रामदास पारधी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उमराळे बुद्रुक दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करत आहे.