Home ताज्या बातम्या छोट्या पंढरपुरात योगिणी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी

छोट्या पंढरपुरात योगिणी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी

वाळूज महानगर : योगिणी एकादशीनिमित्त शनिवारी छोट्या पंढरपुरात भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेवून पाऊस पडावा यासाठी साकडे घातले. येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात परिसरातील भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. अभिषेक व महाआरती करुन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी रांगेत येऊन दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी ह.भ.प. बापू महाराज पेडगावकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

एकादशी निमित्त पानफुल, श्रीफळ, खेळणी व संसार उपयोगी साहित्याची दुकाने थाटल्याने मंदिर परिसरात चैतन्य पसरले होते. यावेळी मंदिर संस्थानतर्फे श्री संत नामदेव महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

कार्यक्रमाला मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव भिकाजी खोतकर, रत्नाकर शिंदे, विठ्ठल वाकळे, पांडुरंग कुलकर्णी, आप्पासाहेब झळके, हरिभाऊ शेळके, वळदगावचे सरपंच कांतराव नवले, कैलास चुंगडे, सुभाष साबळे, जगन्नाथ औताडे, प्रकाश झळके, अशोक झळके, हरिष साबळे, बंकटलाल जैस्वाल, चंद्रभान झळके, राधाकिसन नवले आदींसह भाविकांची उपस्थिती होती.